आज दिनांक १६/०१/२०२६ रोज शुक्रवारला वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली र. न. ३१८ च्या "सभासद प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्य" संस्थेच्या अध्यक्ष्या मा.श्रीमती गीताताई वि. बोरकुटे, उपाध्यक्ष मा.कु. चेतना वि. ठाकुर व मा. सौ. उषा बि. खोये यांचे हस्ते दीप प्रज्वलन व कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच या "सभासद प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्य" मा. सौ. गावळे मॅडम, यांनी उपस्थित होते.
संस्थेची स्थापना दिनांक ०५/०६/२००७ ला झाली असून सतत उतोरोक्त प्रगती होत आहे . संचालक मंडळ व पदाधिकारी, अभिकर्ता, कर्मचारी , यांचे मोलाचे योगदान आहे. संस्थेच्या प्रगती चा वाढता आलेख पाहून उत्कृष्ट सहकारी पतसंस्था जिल्हा सहकार पुरस्कार सन २०१६ द्वितीय क्रमांका साठी निवड झाली होती. तसेच सण २०२१ च्या कामाचे अवलोकन केले असता, दिनांक २७/०२/२०२२ ला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सण २०२२ च्या कामाचे अवलोकन केले असता . सन २०२३ द्वितीय क्रमांका साठी निवड झाली होती. तसेच सण २०२३ च्या कामाचे अवलोकन केले असता, दिनांक २५/०२/२०२४ ला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सण २०२४ च्या कामाचे अवलोकन केले असता, दिनांक ०९/०३/२०२५ ला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच मार्गदर्शक मा. श्री. पी. व्ही. तलमले सर ( सहकार शिक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मर्या. पुणे ), मा. श्री. खोये साहेब, मा. श्री. किशोर भोयर साहेब , यांनी "सभासद प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्य", सर्व सभासद, संचालक मंडळ, पधाधिकारी, कर्मचारी व अभिकर्ता यांना मोलाचे मार्गदर्शन केले व अशा रितीने कार्यक्रमाला पूर्ण विराम देण्यात आले.