९३५६२१३८६३ hvainganga2006@gmail.com
सूचना
वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे!

पतसंस्थेची स्थापना दि. ०५/०६/२००७ रोजी गडचिरोली येथे झाली असून, संस्थेचे कार्यक्षेत्र गडचिरोली तालुका इतके आहे. ही पतसंस्था सहकार तत्वावर आधारित आहे.

महिला सक्षमीकरण करणे, लोकांना बचतीची सवय लावणे, दुर्बल घटकांना समाजात स्थान मिळवून देणे, सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाकरिता आर्थिक सहाय्य करणे या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली.

काही ज्येष्ठ अनुभवी तज्ञ लोकांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन सभासद व सहकारी मित्रांच्या सहकार्याने वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; गडचिरोली (र. नं. ३१८) ची स्थापना करण्यात आली.

संस्थेचे सतत वाढत्या व्यापाचा कारभार कार्यक्षमपणे होणे अगत्याचे आहे. संस्थेला यशाचे शिखर गाठण्याकरिता सर्व सभासदांचे, ठेवीदारांचे, कर्मचाऱ्यांचे, अभिकर्त्यांचे व हितचिंतकांचे सहकार्य अपेक्षित आहे.