मुख्य पान आमचे विषयी वैशिष्टे सेवा ठेव कर्ज संचालक कर्मचारी संपर्क चौकशी
DNSP
DNSP
DNSP
DNSP
DNSP
ठेव योजना
आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत !

          पतसंस्थेची स्थापना दि.०५/०६/२००७ रोजी गडचिरोली येथे झाली असून, संस्थेचे कार्यक्षेत्र गडचिरोली तालुका इतके आहे. हि पतसंस्था सहकार तत्वावर आधारित आहे.महिला सक्षमीकरण करणे, लोकांना बचतीची सवय लावणे, दुर्बल घटकांना समाजात स्थान मिळवून देणे , सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाकरिता आर्थिक सहाय्य करणे. अशा अनेक बाबींकरिता काही ज्येष्ठ अनुभवी तंज्ञ लोकांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन सभासद व सहकारी मित्रांच्या सहकार्याने वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; गडचिरोली र. नं. ३१८ ची स्थापना करण्यात आली. भारतातील इतर राज्या पेक्षा महाराष्ट्रातील सहकारी चळवळ ही अग्रेसर आहे. त्यामुळे सहकारी संस्थांची संख्या व व्यवहार वाढले आहे.

               पतसंस्थेच्या कार्यक्षम कारभारामुळे आपल्या संस्थेला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षा मध्ये लेखापरिक्षण वर्ग ‘अ’ मिळालेला आहे.  तसेच आपल्या पतसंस्थेला सन २०१६-१७ मध्ये गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघ मर्या; गडचिरोली र. नं. १०३ कडून उत्कृष्ट सहकारी पतसंस्था जिल्हा सहकार पुरस्कार -२०१६ करिता गडचिरोली तालुक्यातून द्वितीय  पुरस्कारासाटी निवड करून सन्मानीत केले आहे. पतसंस्थेचे सतत वाढत्या व्यापाचा कारभार कार्यक्षमपणे होणे आगत्याचे आहे. सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील सर्व संचालक मंडळाने, कर्मचाऱ्याने व अभिकर्ता वर्ग सातत्याने कामकरीत असल्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर गाठत आहे . व संस्थेला यशाचे शिखर गाठण्याकरिता सर्व सभासदांचे, व ठेवीदारांचे, कर्मचाऱ्यांचे, अभिकर्त्यांचे व हितचिंतकांचे सहकार्य अपेक्षित आहे..

            धन्यवाद....!

मा.श्री. भास्कर रा. खोये

संस्थापक /मार्गदर्शक

Copyright © 2015 Vainganga Mahila Nagari Sahkari Patsanstha Maryadit; Gadchiroli Powered by : AVCS Solution

website viwers