shape not found
shape not found

“आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून रक्तदान व अन्नदान शिबिराचे यशस्वी आयोजन गडचिरोली”

      आज ०२/०८/२०२५ रोज शनिवारला मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, गडचिरोली, वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या; गडचिरोली र. न. ३१८, गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या; गडचिरोली र. न. ३१६ व श्री. सेमाना नागरी सहकारी पतसंस्था मर्या; गडचिरोली र. न. ३०५ यांच्या संयुक्त विद्यमाने वैनगंगा पतसंस्था गडचिरोली यांचे कार्यालय सर्वोदय वार्ड, पटवारी भवनच्या मागे, गडचिरोली येथे मा. प्रमुख अतिथी श्री. गटकोजवार यांचे प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सन २०२५ सोहळ्याचे कार्यक्रम पार पडले. "सहकारातून शक्ती, रक्तदानातून भक्ती" हे मोलाचे मार्गदर्शन केले व या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थांचे सामाजिक क्षेत्रात प्रभुत्व निर्माण करून देशाच्या आर्थिक घडामोडीला सहकार्य करण्याचे आव्हाहन केले. त्यांनी अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत भविष्यात अधिकाधिक युवकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात उपस्थित मा. श्री. वैद्य साहेब, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, आरमोरी तसेच संस्थेच्या अध्यक्षा व उपाध्यक्षा, कर्मचारी व अभिकर्ता वर्ग उपस्थित होते.

तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे एक दिवसीय रक्तदान व अन्नदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरास संस्थेचे मा. संचालक मंडळ, कर्मचारी अभिकर्ता व सभासद वर्ग उपस्थित होते. या शिबिराला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयोजित केलेल्या शिबिरामध्ये श्री. सेमाना नागरी सहकारी पतसंस्था मर्या; गडचिरोली र. नं. ३०५ तर्फे श्री. भास्करजी खोये, व्यवस्थापक, कर्मचारी श्री. परिमलजी बोरकुटे, श्री. विवेकजी नरुले व सभासद श्री. गंगाधरजी करपे व इतर सभासदांनी रक्तदान केले, गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या; गडचिरोली र. नं. ३१६ तर्फे कर्मचारी श्री. गोहणेजी, श्री. शुभमजी जिल्लेवार संस्थेचे सभासद व इतर यांनी रक्तदान केले. तसेच वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या; गडचिरोली र. नं. ३१८ तर्फे संस्थेचे कर्मचारी श्री. प्रेमलालजी सहारे व अभिकर्ता श्री. अंकितजी थोरात यांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन समाजात सहकाराचे महत्व पटवून देत "सहकारातून शक्ती, रक्तदानातून भक्ती" चे मोल जपले. हे रक्त जिल्हा रुग्णालय, गडचिरोली यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. रक्तदान करणाऱ्यांना जिल्हा रुग्णालय, गडचिरोली यांचेकडून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.

त्याचवेळी सहकारातून समृद्धीकडे वळण्याच्या उ‌द्देशाने वरील नमूद सहकारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान शिबिर आयोजित करून जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथील वॉर्ड क्र. ७ व ८ मध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांना व त्यांच्या परिजनांना अन्न व फळांचे वाटप करण्यात आले. या अन्नदान शिबिरास गरजू आणि गरीब लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यासोबत आपल्या पर्यावरणाला जपत मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, गडचिरोली वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्याः गडचिरोली र. न. ३१८, गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या; गडचिरोली र. न. ३१६ व श्री. सेमाना नागरी सहकारी पतसंस्था मर्या; गडचिरोली र. न. ३०५ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्री. सेमाना देवस्थान, गडचिरोली येथे पार पाडण्यात आला व त्यासोबतच सस्नेह भोजाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वरील संस्थेचे मा. संचालक मंडळ, पदाधिकारी व कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली. शेवटी आयोजकांनी सर्व सहभागी दात्यांचे आणि सभासदांचे आभार मानले.