Cookie Settings
Please allow us to collect data about how you use our website. We will use it to improve our website, make your browsing experience and our business decisions better. Learn more
आज दिनांक
०५/०६/२०२४ रोज बुधवार ला वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली
र. न. ३१८ च्या "१७ व्या वर्धापन दिनानिमित्य" संस्थेच्या अध्यक्ष्या मा.श्रीमती
गीताताई वि. बोरकुटे, उपाध्यक्ष मा.कु. चेतना वि. ठाकुर व मा. सौ. उषा बि. खोये यांचे हस्ते दीप प्रज्वलन व कार्यक्रमाचे
उद्घाटन करण्यात आले .
संस्थेची स्थापना दिनांक ०५/०६/२००७ ला झाली असून सतत उतोरोक्त प्रगती होत आहे . संचालक मंडळ व पदाधिकारी, अभिकर्ता, कर्मचारी , यांचे मोलाचे योगदान आहे. संस्थेच्या प्रगती चा वाढता आलेख पाहून उत्कृष्ट सहकारी पतसंस्था जिल्हा सहकार पुरस्कार सन २०१६ द्वितीय क्रमांका साठी निवड झाली होती. तसेच सण २०२१ च्या कामाचे अवलोकन केले असता, दिनांक २७/०२/२०२२ ला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सण २०२२ च्या कामाचे अवलोकन केले असता . सन २०२३ द्वितीय क्रमांका साठी निवड झाली होती. तसेच सण २०२३ च्या कामाचे अवलोकन केले असता, दिनांक २५/०२/२०२४ ला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच संस्थेचे मार्गदर्शक तथा तज्ञसंचालक मा.श्री. बि. आर. खोये यांनी कर्मचारी व अभिकर्ता यांना मोलाचे मार्गदर्शन केले व अशा रितीने वर्धापण दिनाच्या कार्यक्रमाला पूर्ण विराम देण्यात आले.