shape not found
shape not found

 "आज दिनांक २७/०२/२०२२ रोज रविवारला  वैनगंगा नागरी सहकारी पतसंस्था प्रथम पुरस्काराने सन्मानित सहकार प्रशिक्षण कार्यशाळेत करण्यात आला गौरव "

        गडचिरोली आपल्या ग्राहकाभिमुख कार्यप्रणालीमुळे अल्पावधीतच नावलौकीक मिळविलेल्या गडचिरोली येथील वैनगंगा नागरी सहकारी पतसंस्थेस गडचिरोली येथे आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यशाळेत तालुकास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

          गडचिरोली पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था संघ, सहकार भारती आणि सहकार विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी इंग्लिश अकॅडमी स्कूल, गोकुळनगर येथे दोन दिवसीय सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप पाटील खेवले, प्रा. शेषराव येलेकर, गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सुमती मुनघाटे, मानद सचिव सुलोचना वाघरे, गृहलक्षमी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा उषा भाष्कर खोये, उपाध्यक्षा कमल सातपैसे, संचालक आशा राऊत, रंजिता खेवले तथा इतर संस्थेचे गनमान्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्ह्यातील उत्कृष्ट पतसंस्थांना 'प्राचार्य खुशालराव वाघरे जिल्हा सहकार पुरस्कार २०२१' ने सन्मानित करण्यात आले. यावेळी वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्थेस तालुकास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या या यशामध्ये संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, अभिकर्ता वर्ग, पदाधिकारी आणि सभासदांचा मोलाचा वाटा आहे.