shape not found
shape not found


         वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या; गडचिरोली र. नं. 318 च्या सर्व पदाधिकारी, सभासद, हितचिंतक व ठेविदारांना कळविण्यात आनंद होत आहे की, "स्वातंत्र्य दिनानिमित्त" ध्वजारोहणाचा कार्यक्रम दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारला ठिक सकाळी 7.15 वाजता ध्वजारोहणः- मा.श्री.एच.जी. सौलाखे साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांचे शुभ हस्ते करण्यात आले.  ध्वजारोहणा करिता प्रमुख पाहुणे  मा.श्री.एस. डी. वानखेडे साहेब, मा.श्री. ए. बी. उपासे साहेब, मा.डॉ.डी.डी. मुंघाटे साहेब, मा.श्री. एस. ए. वैदय साहेब,मा. श्री. जी.पी. गौतम साहेब, मा. श्री.पी. गटकोजवार साहेब, मा. सौ. एस.ए. गावळे मॅडम, व इतर सर्व मान्यवर  उपस्थित होते. तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती गीताताई वि बोरकुटे,  उपाध्यक्षा चेतना ठाकुर, तथा सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचारी व अभिकर्ता वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते. 


         दरवर्षी १५ ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. कारण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला. शंभरसव्वाशे वर्षांची गुलामगिरी दूर झाली. या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला.

         अनेक देशभक्त हुतात्मा झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसला होता. म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला या मंगल क्षणाचे स्मरण केले जाते. दरवर्षी पंधरा ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिल्लीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते..

        अनेक ठिकाणी देशभक्तिपर कार्यक्रम साजरे केले जातात. लोक घराघरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात. मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे. ते आपण टिकवले पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल. म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या स्वातंत्र्यरक्षणाची प्रतिज्ञा घेतात.